मुंबई : लिव्ह इन रिलेशनशीपवरून वादग्रस्त वक्तव्य करणार्या समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. लिव्ह इन म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही, अशा शब्दात त्यांनी अबू आझमी यांच्यावर तोफ डागली. चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले आहे की, लिव्ह इन..म्हणजे सोबत राहणं फक्त..तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवर्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वत:ला बायकोचे ‘मालक’ समजणार्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार? देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्याने कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशनशीप काय आहे? तर एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता. वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितले माझा बलात्कार झाला, असे अबू आझमी यांनी म्हटल्यानंतर वाद उफाळला होता.
लिव्ह इन म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही – चित्रा वाघ
Contents hide