• Tue. Jun 6th, 2023

राज्यात सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

मुंबई : राज्यात आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एस चोकलिंगम, र्शावण हर्डीकर अशा एकूण सात अधिकार्‍यांचा समावेश आहे. ठाकरे सरकारकडून आयएएस अधिकार्‍यांच्या बदलीसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.यामध्ये एस चोकलिंगम यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे पदावरुन यशदा पुणेच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शीतल उगले-तेली यांची संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर नियुक्ती. प्रेरणा देशभ्रतार यांची आयुक्त, अपंग कल्याण, पुणे या पदावरुन वध्र्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त र्शावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. र्शावण हर्डीकर यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पी पाटील यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. एन के सुधांशू यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *