• Mon. Jun 5th, 2023

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अनुष्का भोईटे प्रथम

ByGaurav Prakashan

Feb 10, 2021
    वैष्णवी खरात द्वितीय तर तृप्ती नेहर तृतीय क्रमांकाची मानकरी
    पिंपळखुटा/स्वाती न.इंगळे

येथील श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयांच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला व वाणिज्य महाविद्यालय ममदापुर नेरूळ जिल्हा रायगड ची विद्यार्थीनी कु अनुष्का अनिल भोईटे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे तर संघवी केशरी महाविद्यालय पिंपरी चिंचवड ची विद्यार्थीनी कु. वैष्णवी रामचंद्र खरात द्वितीय तर जेंडर अँड विमेन्स स्टडी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीची कु दीप्ती गोपाळ नेहर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.तसेच श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा ता धामणगाव रेल्वे ची कु डिंपल कैलास गावंडे, एस.एस.वि.पी.एस महाविद्यालय धुळे ची कु.माधुरी सुनिल पाटील,नवोदय उच्च माध्यमिक विद्यालय हिवरखेड ची कु शरयू चंद्रशेखर सातपुते ह्या प्रोत्साहन पर बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत.श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा स्थानिक व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शरदराव श्री.इंगळे प्राचार्य डॉ सुभाष एस.मुरे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ.नरेश शं.इंगळे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.

” महिला सक्षमीकरणात सावित्रीबाई फुले यांचे योगदान”या विषयावर ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्य भरातून निबंध आले होते.स्पर्धेसाठी प्रा.रामेश्वर वि.नागपुरे,पवन ह. शिवणकर,प्रा.राजीव भा.देशमुख. श्री. शरदराव श्री. इंगळे,प्राचार्य.डॉ. सुभाष एस. मुरे,लक्ष्मण मु.कांबळे, प्रा.राजीव भा.देशमुख यांचे कडून बक्षीसासाठी रक्कम प्राप्त झाली आहे.गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र चे वितरण आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक प्रा.डॉ.नरेश इंगळे यानी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *