• Sun. May 28th, 2023

राज्यभरात फिरत्या कोविड प्रयोगशाळा

ByGaurav Prakashan

Feb 12, 2021

मुंबई : मुंबईत गुरुवारी स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सर्वसामान्य जनतेला परवडणार्‍या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल त्यांनी स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले.
एनएबीएल अँक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेंव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५00वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोधही घेण्यात आला. कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येतांना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. अशा गरजेच्यावेळी स्पाईस हेल्थ ने पुढे येऊन परवडणार्‍या दरात कोराना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल ही मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राईव्ह हातात घेता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *