- राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
- तो सह्याद्रीचा कडाही दाखवतो
- अन् दाखवतो त्या कड्यात घुमणारा आवाज
- हरहर महादेव म्हणत
- गाजत असलेली शिवगर्जना
- अहो राजे, इथंच घेतली होती शपथ
- स्वराज्याची
- अन् स्वातंत्र्याची
- स्वातंत्र्य पाहिजे होतं आपल्याच माणसांकडून
- जी आपलीच माणसं आपापसात भांडत होती.
- राजे तुम्हीच दिधला ना खरा महाराष्ट्र
- पण आज या महाराष्ट्राचे
- हाल बघवत नाही.
- त्या शिवगर्जना समाप्त झाल्या
- ते सह्याद्रीचे कडे कोसळतात दररोज
- अन् आजही आपापसात भांडतात इथले देशमुख देशपांडे वतनदार
- सर्वत्र राजकीय खेळ चालतो इथं थाटात
- सर्वत्र राजकारण शिजतं.
- आज तुझे मावळेही अफजलखानाला साथ देतात.
- तो जीवा महाला आज कधीच सापडत नाही
- तानाजी तर लढायलाच तयार नाही
- कारण आता तानाजीही
- स्वार्थ पाहतोय
- आजच्या बाजीचं तर ऐकूच नका राजे
- तो बाजीप्रभू बलिदानानं गेला
- आजचा बाजी लाच घेवून सिद्धीला सोडतो
- अन् राज्यभिषेक होण्याआधी तुम्हाला ठार करतो
- पुन्हा कधीही महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण होवू नये यासाठी
- स्वराज्य निर्माण होवू नये यासाठी
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०
Contents hide