राग येणं ही सामान्य बाब असली तरी रागाचा उद्रेक होणं, रागाच्या भरात भावनांवरील नियंत्रण हरपणं हे धोक्याचे संकेत आहेत. अनेकदा अतिभावनिकतेमुळे एंड्रेनॅलिन संप्रेरक मोठय़ा प्रमाणात स्त्रवू लागतं. परिणामी राग अनावर होतो. तुम्हीही याचे साक्षीदार असाल तर लवकरात लवकर राग नियंत्रणाचं कौशल्य आत्मसात करा. अँगर मॅनेजमेंटच्या या काही टिप्स.
आपल्याला राग येतो आणि चुकीच्या प्रकारे व्यक्तही केला जातो. राग शांत झाल्यावर कृतीबद्दल पश्चाताप होऊ लागतो. हे टाळायचं असेल तर राग येण्यापूर्वीची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळायला शका. रागाचा पारा चढताना शरीरातही बदल होत असतात. हे बदल ध्यानात घ्या. रागाचा पारा चढण्यास विशिष्ट परिस्थिती किंवा विशिष्ट लोक कारणीभूत असतात. अशा वेळी काही वेळेसाठी त्या ठिकाणापासून लांब रहा. व्यायामाची मदत- क्रोध ही अतिरिक्त ऊज्रेचा नचरा होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. हीच उर्जा व्यायाम किंवा खेळासारख्या माध्यमातून बाहेर पडत असेल तर राग अनावर होत नाही. त्यामुळे एखाद्या खेळाची मदत घेऊ शकता. मेडिटेशनमुळेही भावना नियंत्रणात राहतील.
राग अनावर होतोय?
Contents hide