• Thu. Sep 28th, 2023

राखी सावंतच्या आईची कॅन्सरशी झुंज

ByGaurav Prakashan

Feb 26, 2021

मुंबई : राखी सावंतने आपल्या आईचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. राखी सावंत बिग बॉस-१४ संपल्यानंतर बिग बॉस हाऊसच्या बाहेर आली आहे. आता पुन्हा आता ती सोशल मीडियावर अँक्टिव्ह झाली आहे. तिने आपल्या आईचा फोटो शेअर केला असून कॅप्शन लिहिली आहे की, ह्यमाझ्या आईसाठी प्रार्थना करा. माझी आई कॅन्सरवर उपचार घेत आहे.
राखीची आई जया सावंत कॅन्सरशी लढत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राखीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई बेडवर बसलेली दिसते.
२१ फेब्रुवारीला बिग बॉस-१४ चा ग्रँड फिनाले झाला होता. राखी सावंत शोची टॉप ५ कंटेस्टेंट्सपैकी एक होती. तिने १७ लाख रुपये घेऊन फिनालेच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बिग बॉस हाऊस बाहेर पडल्यानंतर राखीने स्टेजवर सलमानला सांगितलं होतं की, ती जिंकलेली रकमेचे काय करणार आहे. राखीने सांगितलं होतं की, ही रक्कम ती आपल्या आईच्या उपचारासाठी खर्च करेल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!