• Mon. Sep 25th, 2023

रक्तस्त्राव होतोय?

ByGaurav Prakashan

Feb 18, 2021

जखम झाल्यास, पडल्यास किंवा अपघातामुळे रक्तस्त्राव सुरू होतो. प्रथमोपचारांनंतर रक्तस्त्राव थांबतो. पण जखम गंभीर असल्यास रक्तस्त्राव सुरूच राहतो. बरंच रक्त वाहून गेल्यास रूग्णाच्या आरोग्यालाही धोका पोहोचतो. अशा वेळी तातडीनं डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं असतं. अपघातामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोहोचल्यास अंतर्गत रक्तस्त्रावाची शक्यता वाढते. अशा वेळी रूग्णाला रूग्णालयात दाखल करणं योग्य ठरतं. जखमेमुळे किंवा अपघातामुळे शरीरातून बर्‍याच प्रमाणात रक्त वाहण्यास अतिरिक्त रक्तस्त्राव असं म्हटलं जातं. कधीकधी छोट्या जखमांमुळेही बराच रक्तस्राव होऊ शकतो. रक्तवाहन्यांना जखम झाल्यास अंतर्गत रक्तस्त्रावाची शक्यता वाढते. डोक्याला मार लागणं, टाळूला झालेल्या जखमा, दात पडणं, ठराविक औषधांचं सेवन, हिमोफिलिया, स्कव्र्ही, कॅन्सर, ल्युकेमिया, थ्रोंबोसटोपेनिया, अँनिमिया, पेप्टीक अल्सर, यकृताचे विकार आदी कारणांमुळे तसंच आजारांमध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ शकतो. रक्तस्त्राव झाला तरी तो आपोआप बंद व्हावा यासाठी शारीरिक यंत्रणा कार्यरत असते, मात्र कधीकधी रक्तस्त्राव थांबत नाही. अशा वेळी वेळ न दवडता तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!