अमरावती/यवतमाळ : अमरावती जिल्हय़ात शनिवारी एक दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात १९ ते २९ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी यवतमाळ शहर व ग्रामीण भागासाठी १९ ते २८ फेब्रुवारीपयर्ंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चालू आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकारी एम. देवंदर सिंह यांनी संचारबंदीचे आदेश पारित केले आहे. यानुसार उत्सव, समारंभ, सभा बैठका याकरिता ५0 पेक्षा जास्त व्यक्ती असता कामा नये. अंत्यविधीसारख्या प्रसंगी २0 पेक्षा जास्त व्यक्ती नको. पानटपरी, चहाटपरी, चौपाटी, धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे, मस्जीद, मंदिर, चर्च या ठिकाणी गर्दी करण्यावर प्रतिबंध लादले असून, बाजारपेठांमध्ये सुध्दा निबर्ंध आणले आहे. शाळा कॉलेज शिकवण्या यावरही आफलाईन बंदी केली आहे. या सर्व निबंर्धाचे नियमाचे पालन न करणार्यांना आर्थिक दंड व शिक्षा ठरविण्यात आली आहे. हे सर्व आदेश १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून शहर व जिल्ह्याकरिता लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
अमरावती : जिल्हय़ात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्यापूर्वीच त्यावर निबर्ंध लादण्याची गरज निर्माण झाली आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन शनिवारी सायंकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यादरम्यान सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, हॉटेल्स यासह इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात लॉकडाऊनची प्रक्रिया संपुष्टात येऊन अनलॉकची प्रकिया सुरू झाली होती. मात्र, विदर्भातील काही जिल्हय़ामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येणार्या काही दिवस जिल्हय़ात एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊन काळात संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठान, इनडोअर गेम्स आदी बंद राहणार असून, धार्मिक कार्यक्रमांना केवळ ५ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे काही आठवडे दुकाने रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.