• Mon. Sep 25th, 2023

..म्हणून लागते उचकी

ByGaurav Prakashan

Feb 23, 2021

उचकी आली म्हणजे सगळे म्हणतात, कोणी तरी आठवण काढली असेल, अरे.. पाणी पी आधी. कोणी आठवण काढल्यावर उचकी येते किंवा नाही, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे ! पण पाणी प्यायल्यानंतर बर्‍याचदा ती थांबते, हे मात्र खरे आहे.
छाती व पोट यांच्यामध्ये एक हा स्नायूंचा पडदा असतो. या स्नायूला मेंदूचे आदेश पोचवण्यासाठी फ्रेनिक नावाची नस असते. या डायफ्रॅमच्या खालच्या बाजूला जठर, यकृत ही पोटातील इंद्रिये असतात; तर वरच्या बाजूला हृदय, फुप्फुसे असतात. या पडद्याला वारंवार उद्दीपन मिळाले किंवा फ्रेनिक नसेमुळे वारंवार उद्दीपन झाले तर उचक्या येतात. उचकी येण्याची इतरही अनेक कारणे आहेत. काही मानसिक रोगांतही व्यक्तीला वारंवार उचक्या येतात. शरीरातील आम्ल आणि अल्कली यांच्या प्रमाणात विपरीत बदल झाला तरीही खूप उचक्या येतात. उचक आल्यावर पाणी पणे हा सर्वमान्य असा सुलभ उपचार होय आणि बहुतांश वेळा उचकी थांबण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तरीही उचक न थांबल्यास डॉक्टरच आपली आठवण काढत आहेत असे समजावे आणि ताबडतोब दवाखान्याचा रस्ता धरावा. कारण बहुदा तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची अथवा उपचाराची गरज भासू शकते. अशी ही उचक. थांबली पटकन तर ठीकच अन्यथा उपचारांचा कंटाळा करणं त्रासदायक ठरतं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!