मुलांमध्ये कमी अंतर असेल तर पालकांची तारेवरची कसरत सुरू असते. साधारण एकाच वयाच्या मुलांना कसं समजावायचं हे धर्मसंकट असतं. अशा वेळी महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही टिप्स..
निसर्गाने प्रत्येकाला वेगळी क्षमता दिलेली असते. या नियमाप्रमाणे दोन्ही मुलांमध्ये काही विशेष गुण असतील तर हेरा. त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. वेळोवेळी त्यांचं कौतुक करा. त्यामुळे भावंडांनाही एकमेकांचा आदर करण्याची शिकवण मिळेल. पालकांना भावंडांमधील वादविवाद नवीन नसतात. पण शक्यतो मुलांच्या भांडणांमध्ये पडू नये. निवाड्याची वेळ आली तर निकाल देताना त्यामागील वैचारिक कारणं सांगावी. त्यामुळे गैरसमज निर्माण होत नाही. स्पर्धेतील सरस कामगिरीबद्दल एकाला बक्षीस मिळालं तर तो आनंद सगळ्या कुटुंबाने एकत्र साजरा करायला हवा. पण बक्षीस मिळणं, न मिळणं बाजूला ठेवून स्पर्धेत सहभाग घेणंदेखील साजरं करणं गरजेचं आहे हे जाणून घ्या. मुलांना स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करुन द्या. तडजोडीचा भार कोणा एकावर पडता कामा नये. अनेकदा मोठय़ा भावंडावर ही जबाबदारी टाकली जाते. पण हे टाळा.
मुलांमध्ये अंतर कमी आहे?
Contents hide