मिठाचे अधिक सेवन हानिकारक

स्वयंपाकात मिठाचं महत्त्व काय, हे वेगळं सांगायला नको. मिठाचं योग्य प्रमाण पदार्थाला नेमक चव प्रदान करते तर मिठाची कणी कमी-अधिक झाली तरी पदार्थाची चवच बदलते. आरोग्याच्या दृष्टीने मिठाच्या सेवनाला वेगळं महत्त्व आहे. मिठाचे सेवन आरोग्यदायी असतं. मात्र जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होतात.
मिठाचं जास्त प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतं. दिवसाला साधारण तीन ग्रॅम म्हणजे एका टी स्पूनपेक्षा थोडं कमी मीठ शरीरात गेलं पाहिजे. पण मीठ पूर्णपणे बंद करण्याची काहीही गरज नाही. आपल्या शरीराला मिठाची म्हणजे सोडियमची गरज असते. मिठाच्या विविध प्रकारांबद्दल जाणून घेऊ या..
समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन करून मिठाची निर्मिती केली जाते. या मिठाचं शुद्धकरण झालेलं नसतं. त्यावर प्रक्रियाही केली जात नाही. चवीच्या वृद्धीसाठी आपण काळं मीठ वापरतो. हे मीठ हिमालयात सापडतं. या मिठाचं शुद्धकरण केलं जात नाही. बाजारात गार्लिक किंवा सेलरी मीठ मिळतं. साधं, सैंधव किंवा काळ्या मिठात लसूण किंवा सेलरी घालून अनोखा फ्लेवर दिला जातो.
वेफर्स, पॅकबंद पदार्थ, चीज, बटर अथवा यासारख्या तयार पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण बरंच जास्त असतं. त्यामुळे असे पदार्थ घेताना त्यातली पोषक मूल्यं जाणून घ्यायला हवीत. आहारातून मीठ पूर्णपणे वज्र्य करू नये.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!