अमरावती : अमरावती महानगरपालिका आयुक्त यांनी गुरुवारी चित्रा चौक, इतवारा बाजार, जवाहर गेट, गांधी चौक, राजकमल चौक या परिसरात पायदळ चालून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी जास्तीत जास्त मास्क घातलेले आढळून आले. परंतु, विनाकारण फिरणार्यांची संख्या मोठय़ाप्रमाणात आढळून आली. मास्क न लावणा-यांना तत्काळ दंड यावेळी देण्यात आला. अनेक दुकानदारांशी यावेळी त्यांनी चर्चा करून त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संचारबंदी लागू असतानाही अद्यापही नियम न पाळणार्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी स्वत: गजबजलेल्या चौकांची पाहणी केली व जे नियम पाळत नाही, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली. इतवारा बाजार येथे दुकानदाराने मास्क न लावल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. दूध विक्रेत्याने मास्क न लावल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच त्याला समजवून सांगण्यात आले की, मास्क न घातल्यामुळे इतरही व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता आहे यापुढे दक्षता घेण्याचे सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. गांधी चौक येथे ऑटो चालक यांना सुचना देण्यात आल्या की, त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. औषध दुकानदार यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली की, त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे अनेक तक्रारी याबाबत येत असून, आपण त्यांचे त्वरित नियोजन करावे. सर्व दुकानदारांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. कारण, अनेक नागरिक आपल्या संपर्कात येत असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. महानगरपालिकेतर्फे चाचणी केंद्र सुरू करण्यात आली असून, त्याठिकाणी जाऊन आपली चाचणी त्वरित करून घ्यावी. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता मनपा आयुक्त प्रशांत रोडे कारवाईसाठी रस्त्यावर उतरले असून, नियम न पाळणार्या दंडात्मक कारवाई करीत आहे. आयुक्तांनी आज बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. चित्रा चौक, इतवारा बाजार, जवाहर गेट, गांधी चौक, राजकमल चौक दरम्यान कोविडबाबतच्या नियमांचं उल्लंघन करणार्या दुकांनदारांवर आणि लोकांवर कारवाई केली. इतवारा बाजारामध्ये नियम मोडणार्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनपाच्या अधिकार्यांनी अशा नियम मोडणार्या दुकानदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली. यानंतर जवाहर गेट, गांधी चौक, राजकमल चौक दरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरून नियम मोडणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मास्क न लावणार्यांवर मनपा आयुक्तांनी केली दंडात्मक कारवाई
Contents hide