• Mon. Sep 25th, 2023

मार्च अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल.!

ByGaurav Prakashan

Feb 25, 2021

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर ओसरत असताना पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होते की काय, अशी भीती सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाचा प्रसार कमीच होत आहे. लसीकरण मोहिमेमुळे हा प्रसार आटोक्यात आला आहे. यांसदर्भात तज्ज्ञांनी दिलासादायक मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख वाढत असला तरी मार्च अखेरपयर्ंत ही कोरोनाची संख्या कमी होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोना रुग्णांची संख्या ही मार्च अखेरपयर्ंत कमी होईल, असा दावा राजीव करंदीकर (चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट), डॉ. शेखर मांडे (सीएसआयआर मुख्यालय), प्रा. एम. विद्यासागर (आयआयटी, हैदराबाद) या तज्ज्ञांनी एका लेखात केला आहे. द केस रॅपिड व्हॅक्सिनेशन ऑफ इंडिया अँण्ड रेस्ट ऑफ द वर्ल्ड असा या लेखाचा मथळा आहे. हे तीनही लेखक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल सुपर मॉडेल समितीचे सदस्य आहेत. देशात कोरोनाचा पहिला टप्पा नुकताच येऊन गेला आहे. दुसरा टप्पा अजून यायचा आहे. त्यामुळे पुन्हा देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.
script async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”>

Thank you for reading this post, don't forget to subscribe!