• Sun. May 28th, 2023

मारला माणूस…!

ByGaurav Prakashan

Feb 4, 2021
    ज्याचा नको त्याचा/ ऐकतो आवाज
    चढवती साज /भाषणाचा..
    निष्फळ त्या कथा/खोट्या नाट्या व्यथा
    वाढवती जत्था/ भाविकाचा..
    कल्पनेचे सारे /उभे ते मनोरे
    एक नाही खरे/ पटेल जे
    मारला माणूस/ वाढला कळस/
    जगा लावी पिसं / खूळ त्यांचे
    आंधळी ती श्रद्धा/ तर्क नाही मुद्दा
    राबविती हुद्दा/ संभ्रमाचा..
    माणसाच्या साठी/ करावेत कष्ट/
    भेदाभेद नष्ट/ करा ना रे ..!
    सत्य डावळूनी/ कुठवर पोट/
    करता बा मोठं /टरबूजे
    जगामध्ये किती/ उपाशी झोपती/
    तिथे सेवा नीती/ कामी आणा
    माणूसच देव/ व्यर्थ ते पाषाण
    उगीच भाषण/ कामी नाही
    -प्रा.नंदू वानखडे,
    मुंगळा जि. वाशिम
    9423650 468

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *