• Mon. Jun 5th, 2023

“माता रमाई”

ByGaurav Prakashan

Feb 9, 2021
    दु:खी संसाराला/सुखी तूच केले/
    अोझे तू वाहिले/रात्रंदिन//१//
    माय तूच बाप/मुलांची तू झाली/
    कष्टाची सावली/पांघरली//२//
    जीवन जगता/दु:खावर मात/
    शांत संकटात /रमा माता//३//
    केला तू संसार/गोवरया विकून/
    संघर्ष करुन/ जीवनात//४//
    उपाशी दिवस/रमाने काढले/
    शिक्षण शिकले/ परदेशी//५//
    बाबासाहेबांच्या/स्वप्नपूर्तीसाठी/
    पातळाला गाठी/ आयुष्यात//६//
    रमाई त्यागाने/बाबा मिळे स्फूर्ती/
    चोहिकडे कीर्ती/भीमराव//७//
    संकटाच्या वेळी /नाही घाबरली/
    जीवन जगली/कष्टमय//८//
    जीवनात त्याग/ रमाईने केला/
    जगी घडविला/शिल्पकार//९//
    रमाई मातेला /करितो नमन/
    करांनी वंदन / कोटी कोटी//१०//

    अभंगकर्ता:-
    प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
    रुक्मिणी नगर, अमरावती.
    भ्र.ध्व.-८०८७७४८६०९,
    Email Id :-arunbundele1@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *