- माणसे असतातच धोखेबाज….
- आदीम काळापासून आहेतच तशीच..
- मग का माणसापासून आपण दूर राहू शकतो का?
- माणसे करतीलच दगा, फटका….
- माणसे पेरतील द्वेष,कलह,विखार….
- माणसंच ती,,,वागणार तशीच!
- मग का आपण माणसांना सोडून जाऊ शकतो का?
- माणसे जाळतील माणसांना….
- माणसे पुरतील माणसांना….
- माणसे दिसतील अनोळखी
- मग का आपण माणसांपासून अलिप्त राहू शकतो काय?
- माणसेच ती….
- कधी अशी….
- तर कधी तशी….
- एकाच स्वभावाने जगायला का ती निर्जीव घटक आहेत का?
- क्षणात अशी,,,तर क्षणांत तशी
- वागणारी माणसाची जात..
- मग का आपण माणसांना टाळून राहू शकतो का?
- आपल्याला हवंय माणसांचं जग..
- माणसे असलेलं, माणुसकी जपलेलं
- असतील माणसे,दिसतील माणसे..
- तर जगात टिकतील माणसे
- नाहीतर ‘एक होता माणूस’
- म्हणून पुस्तकात दिसतील माणसे…..
Contents hide
- निलेश रामभाऊ मोरे
- मु,पोस्ट,मनभा, तालुका कारंजा
- जिल्हा वाशीम