- माझ्या भीमाच्या संसाराला
- रमाई ची साथ होती
- स्वाभिमानी ती वीरश्री
- अखंड तेवणारी वात होती
- शिक्षणाची तळमळ मोठी
- तिने जवळून पाहिली
- भिमासाठी आधार बनुनी
- रमाई पाठी उभी राहिली
- परदेशासी भिमराव जाता
- धैर्याने ती लढत राहिली
- नऊ कोटी दलितांसाठी
- चंदनसम झिजत राहिली
- भुकेल्याला घास भरवूनी
- स्वत: मात्र अर्धपोटी
- उन्हातान्हात राबत होती
- पतिव्रता ती भीमसाठी
- दुष्काळाचा दाह सोसूनी
- दिनरात ती कष्टत होती
- माळरानी जशी बाभळ
- बंधावरती तिष्ठत होती
- त्यागाची अन् धैर्याची
- मूर्तिमंत ती देवता
- कोटी कुळांची उद्धारिनी
- महान माझी रमाईमाता
- कोटी कुळांची उद्धरिनी
- महान माझी रमाईमाता..!!
- सागर गुरव.
Contents hide