मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर टीका करत भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. यात अनेक नाव आघाडीवर होती. अखेर प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती करत तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे नाव प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचे मानले जात होते.
२0१४ मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती.
२0१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत त्यांनी विजय संपादित केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस राज्यातील नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा होती. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसने राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नाव स्पर्धेत होती. काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्याने त्यांना सांभाळून घेणारे नेतृत्व निवडण्याचे आव्हान काँग्रेससमोर होते. महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी गढ असलेल्या विदर्भात काँग्रेस कुमकुवत झाली असून, पुन्हा पाय रोवण्यासाठी विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार नाना पटोले यांच्या हाती
Contents hide