• Tue. Sep 26th, 2023

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित

ByGaurav Prakashan

Feb 23, 2021

नवी दिल्ली : दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे करोनाची दुसरी लाट अली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्‍जञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधित रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झाली आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये करोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी १0 लाखांच्या वर गेला आहे.
कोरोनामुळे मरण पावणार्‍यांची संख्या एक लाख ५६ हजार ३८५ वर गेली आहे. रविवारी कोरोनामुळे देशभरामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करणार्‍यांची टक्केवारी ९७.२२ पयर्ंत गेली आहे. म्हणजेच करोनावर आतापयर्ंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१0 जणांनी मात केली. असे असले तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे. मागील पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील करोनाबाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे. फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये करोनाचे एक लाख ९९0 हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ इतकी होती. म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील करोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सर्वाधित रुग्णवाढ झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये मागील २४ तासांमध्ये सहा हजार ९७१ रुग्ण आढळून आले असून ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा रविवारी केली. पुढील आठ दिवसांमध्ये राज्यातील रुग्णसंख्या कशी वाढते किंवा कमी होते त्यानुसार लॉकडाउनसंदभार्तील निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. लॉकडाउन हा पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. मागील १२१ दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. पुण्यामध्ये रविवारी करोनाचे एक हजार १७६ नवे रुग्ण आढळून आले. तर सहा जणांनी करोनामुळे पुणे जिल्ह्यात रविवारी प्राण गमावला. जिल्हा प्रशासनाने करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८१ टक्क्यांनी वाढली आहे. २१ फेब्रुवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये महाराष्ट्रात ३६ हजार ६0६ रुग्ण आढळून आले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!