- होते महात्मा गांधीजी
- म्हणून देश झाला स्वतंत्र.
- छातीवरती गोळ्या झेलून
- वापरला अहिंसेचा तंत्र….
- खादी,चरखा ताकत होती
- अवजार होता सत्याग्रह.
- स्वातंत्र्याचा एकच ध्यास
- स्वतःसाठी नव्हता आग्रह……
- कधी न केली हिंसा बापूने
- अहिंसेचा होता पुजारी.
- महात्म्याचे स्वर निघाले
- मुखा मुखातुन प्रत्येक दारी….
- मिठाच्या सत्याग्रहाने
- बळ मिळाले देशाला.
- कर्तृत्ववान त्या गांधीजींच्या
- सलाम करतो नेतृत्वाला
- बापूच्या फोटोने दिशा दाखवली
- भारत देशाच्या चलनावर.
- गुलामगीरीच्या पाषानातून
- स्वतंत्र झाले मग वळणावर.
- जागृत केला सारा समाज
- समानतेचा मार्ग दिला.
- गोर गरीबांची हाल पाहुन
- आजही आठवते गांधींजी मला..
- सौ.संगिता देवेंद्र बांबोळे
- चंद्रपूर
Contents hide