• Sun. May 28th, 2023

मलायकाच्या या फोटोवर झाला कमेंटचा वर्षाव ..!

ByGaurav Prakashan

Feb 5, 2021

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. मलायका सध्या चित्रपटात दिसत नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामूळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मलायकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत मलायका ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. मलायकाने हिरव्या-निळ्या रंगाच स्कर्ट परिधान केला आहे. मलायकाचा हा ड्रेस डिझायनर अर्पिता मेहताने डिझाइन केला आहे. मलाकाच्या या फोटोला ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.
मलायकाच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव झाला आहे. फक्त चाहते नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खानने ओमायगॉड अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता चंकी पांडेची पत्नी भावना पांडेने फायर इमोजी वापरत मलायकाला हॉट म्हटले आहे. सीमा खान आणि भावना पांडे या दोघी नेटफ्लिक्सवरील शो द फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाइफमध्ये दिसल्या होत्या.
मलायका इंडियाज बेल्ट डान्सर या शोची परिक्षक होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तिची जागा अभिनेत्री नोरा फतेहीने घेतली होती. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मलायकाने धमाकेदार डान्स परफॉमन्स करत शोमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री केली होती.मुंबई: बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणेच कायमच चर्चेत राहणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा. अर्जुन रेड्डी या चित्रपटामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठणारा हा अभिनेता आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे. त्यामुळे केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील त्याची क्रेझ पाहायला मिळते. त्यातच आता विजय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याने तब्बल १00 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचं म्हटलं जात आहे. करण जोहर निर्मित लाइगर या चित्रपटात विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासोबतच त्याने अन्य दोन चित्रपटदेखील साईन केले आहेत. विशेष म्हणजे या तीन चित्रपटांसाठी त्याने तब्बल १00 कोटींचं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, करण जोहरने विजयसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत विजय धर्मा प्रोडक्शनच्या तीन चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यासाठी करणने विजयला १00 कोटींचं मानधन देण्याचं कबूल केलं आहे. तसंच करणने विजयसोबत पॅन-इंडिया आणि बॉलिवूड चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,लाइगर या चित्रपटात विजयचा अँक्शन आणि रोमॅण्टिक असा दुहेरी अंदाज पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या संहितेवर काम सुरु असून विजयसोबत अन्य कोणते कलाकार स्क्रीन शेअर करणार हे गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *