• Mon. Sep 25th, 2023

मंदार देवस्थळीने कलाकारांचे पैसे थकवले ..!

ByGaurav Prakashan

Feb 23, 2021

मुंबई: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. चॅनेलकडून पैसे देण्यात येत असतानाही ते पैसे तंत्रज्ञ आणि कलाकारांपयर्ंत निर्मात्यांनी पोहोचवले नाहीत, असं म्हणत शर्मिष्ठाने सोशल मीडियाचा आधार घेत वाचा फोडली आहे.
शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील हे मन बावरे या मालिकेत काम करत असून या मालिकेत काम केल्याचे पैसे मंदार देवस्थळींनी थकवल्याचं तिने म्हटलं आहे.
गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपयर्ंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायमआम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निमार्ता, त्याने मंदार देवस्थळी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! प्लीज घाबरू नका. प्लीज बोला.सर्पोट अँन्ड प्रे फॉर अस सर्पोट चळवळ, असं म्हणत शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का असा प्रश्नही शर्मिष्ठाने उपस्थित केला आहे.
दरम्यान, शर्मिष्ठासोबतच हे मन बावरे या मालिकेतील मृणाल दुसानीस,संग्राम साळवी आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठा पाठिंबा दिला आहे. तसंच त्यांचेही पैसे थकवल्याचा आरोप निर्मात्यांवर केला आहे.मंदार देवस्थळी यांच्या गाजलेल्या मालिका बोलाची कढी, नातीगोती, सांगाती, वळवाचा पाऊस, मानामनाची व्यथा, बोक्या सातबंडे, आपली माणसं, झुंज, आभाळमाया, किमयागार, वसुधा,खरंच माझं चुकलं का???, वादळवाट, अवघाची संसार,जिवलगा, मायलेक, कालाय तस्मैनम:, कुछ तो लोग कहेंगे, होणार सून मी या घरची, माझे पती सौभाग्यवती, फुलपाखरु, गुलमोहर,सूर राहू दे, हे मन बावरे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!