हाय हिल्समुळे चालण्यात एक आगळा डौल येत असला तरी अशा हिल्समध्ये चालता येईल का, हा प्रश्न अनेकंना असतो. तुम्हीही अशा आरामदायी हिल्सच्या शोधात असाल तर ब्लॉक हिल्सचा पर्याय निवडा.
ऑकेजननुसार ब्लॉक हिल्सची निवड करू शकता. फॅमिलीसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत नाईटआउटचा प्लान असेल तर हाय ब्लॉक हिल्स हा चांगला पर्याय आहे. जीन्स आणि ब्लॅक ज्ॉकेटवर तुम्ही या हिल्स घालू शकता. ब्लॉक हिल्स आरामदायी असतात. म्हणून डिस्को नाईटलाही तुम्ही या हिल्स घालू शकता. ऑफिस मिटिंग किंवा इतर फॉर्मल ऑकेजनसाठी मड राईज ब्लॉक हिल ट्राय करू शकता. कॉर्पोरेट सूट किंवा स्कर्टवर या हिल्स शोभून दिसतील. साधारणपणे वेस्टर्न वेअरवरच ब्लॉक हिल्स उठून दिसतात. ब्लॉक हिल्स घेताना कोणता रंग निवडावा असा प्रश्न पडला असेल तर ब्लॅक इज द सेफेस्ट ऑप्शन. अर्थात तुम्ही वेगवेगळ्या रंगात आणि आकारात ब्लॉक हिल्स घेऊ शकता. टी-स्ट्रेप्स किंवा पीप टोज अशा शेप्सची सध्या चलती आहे. कपड्यांना मॅचिंग होतील अशी पादत्राणं तुम्ही निवडू शकता. कलर्ड हिल्स तुमचं व्यक्तिमत्व अधिकच खुलवतील.
ब्लॉक हिल्स घेताय?
Contents hide