ब्लशरचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. बरेचदा ब्लशर लावताना महिलांचे हात थरथरतात आणि चूक होण्याची शक्यता वाढते. म्हणून गालांवर ब्लशर लावण्यासाठी योग्य ब्रश निवडावा. योग्य शेपचा ब्रश असेल तर चांगले परिणाम मिळून चेहरा चमकेल. हसल्यावर गालांच्या वर येणार्या भागावर ब्लशर वापरायचा असतो. त्याचबरोबरच चीक बोनवर ब्लशर लावला जातो. तुम्हाला ब्लशरच्या साह्याने फेस शेडिंग करायचं असेल तर आधी बराच सराव करायला हवा. अन्यथा, हा प्रयोग फसण्याची दाट शक्यता असते.
Contents hide