• Thu. Sep 28th, 2023

बुद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.!

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021
    समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व
    न्यायाने मी वागणार आहे.
    मैत्री, करुणा, वीर्य
    मी आचरणार आहे.
    पंचशील, अष्टांग मार्ग
    मी पाळणार आहे.
    शील, समाधी, प्रज्ञा
    मी जगणार आहे.
    दुःख, अनित्य, अनात्माची.
    जागृती ठेवणार आहे.
    प्रतित्यसमूत्पाद, कार्यकारण .

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    भाव मी जाणणार आहे.
    लोभ, मोह, द्वेशाला
    मी जाळणार आहे.
    प्रतिक्रांतीला क्रांतीने
    उत्तर देणार आहे.
    भवचक्रातून धम्मचक्रा

    कडे मी जाणार आहे.
    विधायक, कुशल
    मी राहणार आहे.
    प्रबुद्ध भारत
    मी घडविणार आहे.
    बुद्ध धम्मानेच जगाचा
    उद्धार होणार आहे …!

    सुरेशकुमार बोरकर

    बडनेरा, अमरावती
    9850752589