अमरावती : शासकीय, तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइन वर्कर्सने पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी व लसीकरण मोहिम पुढच्या टप्प्यात जाऊन सर्वांना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील लसीकरण केंद्रात जाऊन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी स्वत: लस घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. जयश्री नांदूरकर, डॉ. काळे आदी उपस्थित होते.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मास्क वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज सकाळी पीडीएमसीला भेट देऊन पाहणी केली व स्वत:हून नोंदणी कक्षात जाऊन नोंदणी करून संपूर्ण प्रक्रियेतून जात लस घेतली. अमरावती महानगरपालिका क्षेत्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी तथा माननीय आयुक्त महानगरपालिका यांचेमार्फत कोरोना नियंत्रण व प्रतिबंधक उपाय योजनाकरता सुचना जारी करण्यात आल्या आहेत. होम आयसोलेशन मधील रुग्णांना तसेच खाजगी दवाखाने शासकीय रुग्णालय यांनी लक्षणे असलेली व लक्षणे नसलेली रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना रुग्णांचे मोबाईल क्रमांक तसेच रुग्णांचे पत्ता व रुग्णांचे नोंदणी करणे अत्यावश्यक असून त्यांना घराबाहेर न निघणे, मास्क वापरणे, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे इत्यादी गोष्टींच्या सूचना देण्यात याव्यात होम आयसोलेशन मधील रुग्णांचे नोंदणी वेबसाईटवर करावे सदर