• Wed. Sep 20th, 2023

फिटनेस जपण्यास प्राधान्य द्यायला हवं..!

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्पर्धेत टिकून रहायचं तर फिटनेस जपण्यास प्राधान्य द्यायला हवं. या हेतूने आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही. फिटनेस हा एक प्रवास आहे जो सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू व्हायला हवा. हा प्रवास सुकर होण्यासाठी..
आयुष्याला अचानक शिस्त लागत नाही. त्यामुळे एक एक पाऊ ल पुढे टाका. जंक फूड, अनारोग्यदायी पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्यांचं प्रमाण कमी करा. सुरूवातीला जीवनशैलीत छोटे छोटे बदल करा. त्यांची सवय करून घ्या. मगच पुढे जा. व्यायाम आणि आहार यावर लक्ष केंद्रित करा. आपण किती खाल्लं, कोणता व्यायाम केला याची नोंद करत राहिल्याने तुम्ही जबाबदार व्हाल. वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचा अंदाज येईल. प्रेरणादायी व्हिडिओ बघून किंवा गाणी ऐकून काही होणार नाही. तुमच्या मनात फिटनेस राखण्याची इच्छा जागृत व्हायला हवी. तरच ध्येय गाठू शकाल. कुठेतरी काहीतरी वाचलं म्हणून ते लगेच अंमलात आणू नका. जमतील तेवढय़ाच गोष्टी करा. वेगवेगळी डाएट फॅड्स आहेत. त्यांच्या मागे लागू नका. सरळ, साधे, सोपे फंडे अंगिकारा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!