डेंग्यू रोगात सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. त्यामुळे रुग्ण गंभीर अवस्थेत जातो. या प्लेटलेट्स म्हणजे असतात तरी काय आणि त्यांचे काय कार्य असते, याची माहिती असणे आवश्यक आहे.
मनुष्यशरीरात हाडांच्या आतील पोकळीत असणार्या मज्जांमध्ये (बोन मॅरो) प्लेटलेट्स तयार होतात आणि याचे प्रमुख कार्य म्हणजे योग्य वेळी, गरज भासेल तेव्हा रक्ताला गोठविणे. मानवी शरीरात साधारणत: दीड लाख ते साडेचार लाख प्लेटलेट्स प्रति मायक्रो लिटर रक्तात असतात.
प्लेटलेट्स कमी होण्यास प्रमाुख्याने पुढील कारणे असतात.
१) मज्जा – बोनमॅरो द्वारेच त्याचे उत्पादन कमी होते.
२) अप्लॅस्टिक अँनेमिया या आजारात प्लेटलेट्सचे उत्पादन थांबते.
३) कॅन्सर या आजारात बोनमॅरोवर आघात होऊन प्लेटलेट्स मृत होतात.
४) केमोथेरपीमुळे प्लेटलेट्स मृत होतात.
५) अनेक विषाणू जसे रूबेला, डेंग्यु इत्यांदीमुळे प्लेटलेट्स निर्मिती कमी होते आणि शरीराच्या प्रतिकारक्षमतेद्वारे जेव्हा या विषाणूंवर विजय मिळविला जातो तेव्हा त्या प्लेटलेट्स पुन्हा वाढतात.
६) काही अँन्टिबायोटिक्स, मद्य, काही औषधी या प्लेटलेट्सचे उत्पादन कमी करतात.
७) काही संधिवाताच्या प्रकारात शरीराची प्रतिकारक्षमता चुकून प्लेटलेट्स वर हल्ला करून त्यांना नष्ट करते.
शरीरात पांथळी (गॉल ब्लॅडर) नावाचा एक अवयव असतो. त्यात प्लेटलेट्स थोड्या प्रमाणात साठवल्या जातात, परंतु काही कारणांनी पांथळीला सूज आल्यास भरपूर प्रमाणात प्लेटलेट्स साठविल्या जातात आणि रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते.
प्लेटलेट्स कमी झाल्याची लक्षणे
प्लेटलेट्सचे प्रमुख कार्य म्हणजे रक्त गोठवणे. प्लेटलेट्स कमी झाल्यास – दात घासतांना थोडे देखील लागल्यास जखम होऊन रक्तस्त्राव होतो व लवकर बंद होत नाही.
शरीरावर कोठेही थोडा मुका मार लागला, दाबले तर त्वचेखाली रक्तस्त्राव झाल्याचे दिसते.
प्रारंभिक उपचार
लघवी किंवा मलावाटेने रक्तस्त्राव होत असतांना बस्ती (एनिमा) किंवा रेचक औषधी घेऊ नये.
त्वचेखाली छोटे छोटे रक्ताचे डाग दिसू शकतात. अशा वेळी सैल कपडे घालावेत.
शरीरात कोठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. जसे नाग, कान, मूत्र मार्ग, स्त्रियांमध्ये योनी मार्ग इत्यादी.
ज्या स्त्रियांची प्रसूतीची वेळ जवळ आली आहे अशा स्त्रियांना प्लेटलेट्स कमी झाल्याचे अनेकदा आढळते आणि प्रसूतीनंतर ते प्रमाण प्राकृत होते. याचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु या काळात प्लेटलेट्स निर्मितीच्या प्रमाणात घट होते हे लक्षात आले आहे.
प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यावर अनेकानेक औषधी बाजारात आली आहेत. परंतु, सर्वात सोपी आणि अत्यंत स्वस्त औषध म्हणजे पपईचे पान. पपईच्या पानाचा रस काढून तो घेतल्यास प्लेटलेट्सची संख्या आश्चर्यकारक गतीने वाढते, असे सिद्ध झाले आहे. आजकाल तर या पपईच्या स्वरसाच्या कॅप्सूलदेखील निघाल्या आहेत. तरीही आयुर्वेद तज्ज्ञाशिवाय कुठलाही उपाय करू नये.
प्लेटलेट्स कमी होण्यास प्रमाुख्याने पुढील कारणे असतात…!
Contents hide