• Sat. Sep 23rd, 2023

प्रा.गजानन जाणे यांना आचार्य पदवी

ByGaurav Prakashan

Feb 9, 2021

तिवसा/स्वाती इंगळे

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे प्रा.गजानन शिवहरी जाणे,यांना नुकताच आचार्य पदवी जाहीर केली आहे. प्रा.जाणे हे सुहालाल पाटणी कला व वाणिज्य महाविद्यालय,पुलगाव येथे कार्यरत असून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी.पदवी प्राप्त केलेली आहे.त्यांनी वर्धा जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासात नाबार्डचे योगदान : एक आर्थिक अन्वेषण
या विषयावर संशोधन केले आहे. त्यांना नारायणराव स्मृती मॉडेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कारंजा (घाडगे) चे डॉ संजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य पूर्ण केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अजित कुमार पाटणी,प्राचार्य डॉ. भूषण रामटेके,प्राचार्य डॉ.हरिभाऊ वेरुळकर,डॉ. सुधाकर भुयार,डॉ. हेमराज चौधरी,डॉ. प्रविण काळे, डॉ हेलोंडे, डॉ.धुमणे,डॉ दारुंडे,डॉ गद्रे डॉ.ठाकरे डॉ.नरेश इंगळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.