अमरावती : रविवार ३१ जानेवारी २0२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आ.सुलभा खोडके यांनी अमरावती महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांच्या नियोजनाला घेऊन अनेक मुद्दे उपस्थित केले.अमरावती महानगर पालिका ही वर्ग ड महानगर पालिका असल्याने महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून कमी निधी मिळतो, या निधीतून पर्याप्त विकास कामे करणे शक्य होत नाही, त्यामुळे महापालिका क्षेत्रासाठी मंजूर नियतव्यय वाढून देण्यात यावा, असा मुद्दा आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला.जिल्ह्यातील विकासकामांकरिता निधीच्या नियोजनाला घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला महत्व असते, त्यामुळे मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालय येथे औषध पुरवठा साठी स्वतंत्र हेड निर्माण करण्याची मागणी आ. सुलभा खोडके यांनी केली होती. त्याचे काय झाले. अशी विचारणा आमदार महोदयांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना या बैठकीत केली असता, त्यावर त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी हेड निर्माण केल्या जात असून उर्वरित कामकाज लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार महोदयांनी जिल्हाधिकार्यांना विनंती केली कि, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे संपूर्ण तपशिलासह लेखी स्वरूपात द्यावे, म्हणजे त्या मुद्द्यांमध्ये काय त्रुटी आहेत, त्या सुधारून त्या-त्या प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणे उपयुक्त ठरेल, आ. सुलभाताई खोडके यांच्या या सूचनेचे उपस्थित समितीच्या सर्व सदस्यांनी देखील स्वागत केले.दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन ) मध्ये आवश्यक सेवा -सुविधांच्या पूर्ततेबाबत चा मुद्दा देखील आमदार महोदयांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. भंडारा येथील आगजनीच्या दुदैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार महोदयांनी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन ) ची पाहणी केली असता रुग्णालयात गरोदर मातांकरिता गरम पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे महिलांसाठी गरम पाण्याची सुविधा व्हावी म्हणून तेथे सोलर हीटर लावण्याची गरज असल्याचे सांगून आमदार महोदयांनी तेथे विद्युतीकरण तसेच १0 व्हील चेअर , ३0 नवीन स्ट्रेचर ,१0 वॉटर कुलर उपलब्ध करून देण्याची मागणी केली . त्याच बरोबर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय , जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये औषधांच्या मुबलक पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र हेड निर्माण करून डीपीसीतून मंजूर निधीतून गरीब रुग्णांना औषधी उपलब्ध करण्याची मागणी आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान केली .
प्रस्तावित नियतव्यय वाढविल्यास मनपा क्षेत्रासाठी मिळणार भरीव निधी
Contents hide