• Sun. Jun 11th, 2023

प्रविण बोपुलकर यांना ‘यलाई’ पुरस्कार जाहीर

ByGaurav Prakashan

Feb 9, 2021

अमरावती : वऱ्हाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था ,बार्शीटाकळी जिल्हा अकोला द्वारा संचलित अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला यांचेमार्फत वऱ्हाडी भाषेत प्रयोगशील लिखाण व उदयोन्मुख साहित्यिक व वऱ्हाडी चळवळ जोपासण्याकरिता दिला जाणारा मा.पुष्पराज गावंडे ‘यलाई’ पुरस्कार 2021 हा प्रविण जगन्नाथ बोपुलकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या 23 फ़ेबृवारी 2021 रोजी संत नगरी शेगाव इथे होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रविण बोपुलकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील खेट्री येथील रहिवासी असून सध्या मुंबईला वस्तू व सेवा कर विभागात नोकरीला आहेत. नोकरी करून टीम शब्दवेल साहित्य समुहाच्या माध्यमातून जवळपास पाच हजार साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. वऱ्हाडी भाषेतील त्यांची ‘कयस’ ही कादंबरी लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच परिवार,शब्दवेल साहित्य समूह,मराठी साहित्य वार्ता परिवार व जाई फाउंडेशन मुंबई या परिवारातून विशेष कौतूक होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *