• Mon. May 29th, 2023

पोषाखाद्वारे खुलवा व्यक्तिमत्त्व

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021

दोस्तांनो, ऑफिसमध्ये तुम्ही नीटनेटकं आणि टापटिपच असायला हवं. अशा ठिकाणी कॅज्युअल कपडे घालता येत नाहीत. कडक इस्त्रीचा शर्ट, ट्राउझर अशा पेहरावात ऑफिसला जाणार्‍यांचा रुबाब काही वेगळाच असतो. अशा कर्मचार्‍यांना मानही मिळतो. गबाळं राहून काहीच फायदा नसतो. तुम्हालाही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडायची असेल तर ऑफिसच्या कपडे खरेदी करताना विशिष्ट रंगांना प्राधान्य द्या. ठराविक रंगांचे शर्ट तुमच्याकडे असायलाच हवेत. कोणते आहेत हे रंग? पाहू या.
पांढर्‍या रंगाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. इस्त्री केलेला छानशा पांढरा शुभ्र शर्ट तुमचा रुबाब नक्कीच वाढवेल. पांढर्‍या रंगाचे काही गुण आहेत. शांत, मनमिळावू, एकाग्र आणि सर्मपित वृत्ती पांढर्‍या रंगातून झळकत असते. असे गुण कार्यस्थळी खूप उपयुक्त ठरतात. पांढरा शर्ट घालून तुम्ही समोरच्यावर प्रभाव टाकू शकता.
ग्रे शर्टही छान दिसतो. अनेकांना ग्रे कंटाळवाणा आणि एकसुरी रंग वाटतो. पण प्रत्यक्षात तसं नाही. या रंगामुळे तुम्ही उठून दिसाल. ग्रे रंगाचे शर्ट फारसे घातले जात नाहीत. त्यामुळे तुमच्या या निवडीचं कौतुक होईल.
निळा रंगही आकर्षक आहे. निळ्या रंगातले शेड्स तुम्ही घालू शकता. निळ्या रंगाचे कपडे घालणारे कामाच्या ठिकाणी यशस्वी होतात,, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे तुमच्याकडेही निळा शर्ट असायला हवा.
हिरवा हा सुद्धा हटके रंग आहे. मात्र तो तुम्हाला नीट कॅरी करता आला पाहिजे. हिरवा रंग समृद्धी, प्रगतीचं प्रतीक असतो. हा रंग ताजेपणाचा अनुभव देतो. त्यामुळे या रंगाचा शर्टही मस्ट हॅव आहे. हिरव्या रंगातल्या विविध छटा खूप सुंदर दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *