• Tue. Sep 26th, 2023

पोशिंदा

ByGaurav Prakashan

Feb 26, 2021

पुस्तकात अन् जयघोषात

मजसाठी शब्दांचा धंदा

मी जगाचा पोशिंदा

मी जगाचा पोशिंदा….

आज मोडला आहे कणा

अन् ताठ जगता येईना

तरी सभेत वर्णिले मला

मीच देशाचा कणा

    मातीशी माझे नाते
    कुणी तोडू पाहत आहे
    संकटाना मी आता
    गुलाम वाटत आहे
    वाटे झुगारूनी द्यावे
    हे काळया जगताचे जीणे
    पण कानी पडत आहे
    माझ्या पिल्लांचे हंबरने
    भिजुनी घामात सर्वांगाला
    देतो सौख्य या जगताला
    उरी धरीतो एका आशेला
    आठव येईल माझी राजाला

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    सुनिल ढोकणे

    तुलसी नगर, मूर्तिजापूर
    9421830710

(Images Credit : Bookganga)