तिवसा : कोरोना काळात कोणालाही रोजगार नाही तर अनेकांचे रोजगार कोरोणामुळे गेलेत मात्र या काळात दररोज पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने पेट्रोल डिझेल गॅसचे भाव कमी करण्यासाठी तिवसा तहसील कार्यालयावर शिवसेनेने धडक देत तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी लावल्या.राज्यभर शिवसेनेचे वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ संदर्भात आंदोलन करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून तिवसा येथे सुद्धा आंदोलन करण्यात आले, यावेळी मागण्या संदर्भात तहसीलदाराला निवेदन देण्यात आले, यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप गौरखेडे,दत्ता माळादे, प्रकाश पडोळे, किशोर सातपुते, अजय आमले सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
Contents hide