• Mon. Sep 25th, 2023

पूजा चव्हाण प्रकरण : भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी

ByGaurav Prakashan

Feb 28, 2021

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. भाजपच्या महिला मोर्चाने राज्यातील विविध शहरांमध्ये शनिवारी आंदोलने केली. मुलुंड टोल नाका, बीड, औरंगाबाद, नागपूर, जालना, पुणे आणि ठाण्यामध्ये ही आंदोलने झाले. अनेक ठिकाणांवर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर बसून चक्काजाम केला आहे. मुंबई आणि बीडमध्ये झालेल्या आंदोलनांदरम्यान महिला कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली, ज्यानंतर अनेक महिलांना ताब्यात घेतले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलेला आहे. सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. शुक्रवारी विधान परिषेदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एखाद्या समाजाच्या दबावात येण्याऐवजी राठोड यांचा राजीनामा घ्यावा.