• Fri. Jun 9th, 2023

पहाट…

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021
  गवताची वाट
  दवांत भिजली,
  कापऱ्या थंडीत
  पहाट निजली…
  राजस फुलांत
  रंग साकळले,
  बंद कळ्यातून
  थेंब ओघळले…
  कोवळ्या उन्हात
  आकाश देखणे,
  नदी काठावर
  पाखरांचे गाणे…
  शामल चाहूल
  झूळूक लाजरी,
  क्षितिज हलके
  फिक्कट केशरी…
  चांदणे पिऊन
  दारात सांडली,
  सोनेरी पहाट
  उन्हात मांडली…
  सतिश कोंडू खरात
  वाशिम
  ९४०४३७५८६९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *