पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

    तिवसा/स्वाती न.इंगळे

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली आहे.या मोहिमेमध्ये श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या सहकार्याने ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेअंतर्गत एकूण १०४ बालकांना पोलिओ लस देण्यात आलेली आगावातील ३६ मुले ४० मुली बाहेर गावावरून आलेले१२ मुले १० मुली आणि पाच वर्षावरील २ मुली आणि २ मुले यांचा समावेश आहे.या मोहिमेकरिता अंगणवाडी सेविका सिंधू जंजाळ सूर्यकांता धांडे,सुरेखा गाढवे आशा वर्कर जयश्री बेदुरकर कमल राघोर्ते यांनी परिश्रम घेतले.लसीकरण जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पुढाकार घेतला होता.या मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेश इंगळे,डॉ.मेघा सावरकर तसेच स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला होता.या मोहिमेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र अंजन्सिंगीच्या डॉ खडसे मॅडम अंबाडकर मॅडम पी ए पोहेकर गटप्रवर्तक नेहा पडघान शाळा व्यवस्थापन समिती सभापती प्रमोद घोळकी यांनी सदिच्छा भेट दिली होती

Thank you for reading this post, don't forget to subscribe!