वरूड : गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीचा वाद सुरू असताना पत्नी मात्र काही दिवसांपासून माहेरी राहत असताना दुपारच्या सुमारास घरी कोणीच नसल्याची संधी साधत पतीने घरात घुसून पत्नीचा दोरी व केबलने गळा दाबून खून केल्याची घटना येथूनच जवळ अलेल्या टेभुरखेडा येथे दुपारी १२:३0 च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी पुसला येथून मोठय़ा शिताफीने ताब्यात घेतले.
प्राप्त माहीतीनुसार मुळची टेंभुरखेडा येथील रहिवाशी असलेल्या अंकिता हिचा प्रेम विवाह तालुक्यातील सावंगी येथील रहीवाशी असलेला दीपक जिचकार याच्यासोबत एक वर्षापूर्वी झाला होता. काही दिवसापर्यंत दोघांचा संसार व्यवस्थित चालला. परंतु अवघ्या काही दिवसांपासून दोघामध्ये वादावादी सुरू होती. दोघांच्या सततच्या भांडणामुळे अंकीता ही काही दिवसापासून माहेरी तिच्या आई-वडिलांसोबत राहात होती. अधून-मधून दीपक सुध्दा त्या ठीकाणी येत जात होता. काही दिवसांपूर्वीच अंकीताने दीपकविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची व फारकत घेण्याची मागणी केली होती. हे प्रकरण पोलिस तपासामधे होते. विषेश म्हणजे मृतकाचा भाऊ सुद्धा मद्यपी असल्याने मद्यधुंदीमध्ये तो अनेकदा दीपकला साथ द्यायचा. आज सकाळच्या सुमारास घरामध्ये कोणी नसल्याची माहिती मृतक अंकीताच्या भावाने दीपकला दिली आणि तो घरी कोणी नसल्याची संधी साधत घरी आला. घरातील वरच्या माळावर राहत असलेल्या एका खोलीमध्ये अंकिताशी भेटायला दीपक गेला. त्या ठिकाणी त्याने तिला संभोग करण्याची मनीषा बोलून दाखवली. परंतु त्याच ठिकाणी दोघांची बाचाबाची झाली असावी, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. बाचाबाचीदरम्यान दीपकने खोलीमध्ये असलेल्या मोबाईल चार्जर केबल व दोरीच्या साह्याने अंकीताचा गळा आवळला त्यातच तिचा मृत्यू झाला आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. अंकीताचा खून झाल्याची माहिती संपूर्ण गावासह तालूक्यात वार्यासारखी पसरली. काही वेळातच पोलिस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी मृतक अंकीताची बहीण कुमारी अमृता सुधाकर अळसपुरे (२२) रा.टेभुरखेडा हिच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक राजेंद्र जिचकार ( २९) रा. सावंगी ह.मु.टेभुरखेडा याच्याविरुद्ध भांदवि ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन घटनास्थळाला अपविभागिय पोलिस अधिकारी कविता फरताडे , सहाय्यक पोलिस निरीक्षक संघरक्षक भगत यांनी भेट दिली. मनोज कळसकर, संदीप उल्हे, यांनी आरोपीचा शोध घेऊन मोठय़ा शिताफीने आरोपीला पुसला येथून अटक केली.
पत्नीचा केबलने गळा आवळून खून
Contents hide