पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील बाणेरमध्ये मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी सावंत यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.१९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आली. तिथून १९९५ मध्ये ते नवृत्त झाले. नवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखालीच पार पडली होती.
न्या.पी.बी. सावंत यांचे निधन
Contents hide