मुंबई : आपल्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. कोरोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडेसे बंधन तुमच्यावर आणणे गरजेचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी जाहीर केली. मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा. येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले.
मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांसह राज्यातील इतर भागात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढतच आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.
संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणार्यांवार कडक कारवाई होणार. कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणे हे कुणालाच आवडणार नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पुढील दोन महिन्यात आणखी एक-दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापयर्ंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झाले. मास्क हीच आपली कोरोनाच्या लढाईतील ढाल आहे. त्यामुळे लस घेण्याअगोदर व नंतर देखील मास्क घालणे अनिवार्य आहे. शिस्त पाळणे हे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नियम पाळा, लॉकडाऊन टाळा
Contents hide