• Tue. Sep 19th, 2023

नाम सेवाभाया……

ByGaurav Prakashan

Feb 15, 2021
    जगी गाजतोय । नाम सेवाभाया ।
    त्यांची छत्रछाया । आम्हांवर ।।
    विज्ञान पूजक । निसर्ग रक्षक ।
    शत्रुत वचक । आजपण ।।
    बोलून गेलेले । होत आहे खरे ।
    नद्या,सरोवरे । शुष्क झाली ।।
    नाही मागणार । देवी पशुबळी ।
    उमलती कळी । नका तोडू ।।
    वडिलांची काठी । हातात घेऊन ।
    गुरांना चारून । ऋणी झाले ।।
    रणी कडाडली । ऐसी तलवार ।
    मुघल बेजार । तयामुळे ।।
    कार्य कसे वर्णू । लेखणी पुरेना ।
    आसही मिटेना । दर्शनाची ।।
    कोणी तोळावाळो । कोणी मोतीवाळो ।
    म्हणे गादीवाळो । कोणी त्यांना ।।
    चमत्कार नाही । कुठेही जगात ।
    आहे विज्ञानात । बळ फार ।।
    त्यांची शिकवण । आठवू मिळून ।
    सत्यची जगून । राहू जगी ।।
    भायापुढे नत । होऊ मिळुनिया ।
    कर्म करुनिया । अजु म्हणे ।।
    शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

Thank you for reading this post, don't forget to subscribe!