धामणगाव रेल्वे : कोरोना काळात सर्वसामान्य माणसांना वीज बिलात सूट देणार असल्याचे प्रथम राज्य शासनाने घोषित केले. मात्र, आता वाढीव वीज बिल देऊन वसुलीसाठी नोटीसा पाठवीत असल्याने शुक्रवारी भाजपाच्या वतीने आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत वीज बिलांची होळी करून वीज मंडळा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात आलेले विज बिल माफ करण्याची घोषणा आघाडी सरकारने केली होती मात्र आता अवास्तव वीज बिल ग्राहकांना देण्यात येत येऊन सोबतच वीज बिल न भरल्यामुळे नोटिसा बजावण्यात येत आहे. आघाडी सरकार विरोधात ग्रामीण जनतेत रोष निर्माण झाला आहे वीज बिल पूर्ण माफ करावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज वीज मंडळा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी वीज बिलांची होळी केली. वीज मंडळाचे उपविभागीय अभियंता यु के राठोड यांना निवेदन देण्यात आले. वीज ग्राहकांकडून जबरदस्तीने वसुली केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका प्रशासनाला आ.अडसड यांनी दिला. ग्राहकांना नोटीस पाठवू नये यासंदर्भात अल्टिमेटम देण्यात आले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, सरचिटणीस नितीन मेंढुले, सुनील साकुरे, उषा तीनखेडे, दीपाली मानकर, राजेंद्र पोपळघाटे, अनुराग मुडे, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सुनील जावरकर, हेमकरणं कांकरिया,बंडू पाटील, विनोद धुवे, मंगेश मारोडकर, गजानन रोंघे, नलिनी मेर्शाम, सीमा देवतडे, विद्या राऊत, नवृत्ती लोखंडे, चेतन कट्यारमल, वैभव देशमुख,अशोक शर्मा अनिल गोडबोले,गज्जू रॉय, गणेश ठाकूर, रामसागर पांडे अशोक राय ,सुधीर मुंलवंडे, आनंद राय, सुरेश धोटे, गंगाराम शेंद्रे, मोहम्मद इब्राहिम,गोलू ठाकूर, दुर्योधन राघोर्ते, वैभव देशमुख पवन साबळे यांची उपस्थिती होती.