धाडसी खेळाची आवड आहे?

दोस्तांनो, भारतातही सध्या धाडसी खेळ म्हणजे अँडव्हेंचर स्पोर्टसची क्रेझ वाढू लागली आहे. रिव्हर राफ्टंग,गर्यारोहण, रॉक क्लाईंबंग असे प्रकार लोकप्रिय होत आहेत. बंजी जंपिंग हा सुद्धा असाच एक धाडसी खेळ. गेल्या काही वर्षांत बंजी जंपिंगचं प्रस्थ चांगलंच वाढलं आहे. आपल्याकडच्या अनेक शहरांमध्ये बंजी जंपिंगही सोय आहे. तुम्हालाही धाडसी खेळांची आवड असेल, जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणत जगावेगळं काहीतरी करण्याची हौस असेल तर बंजी जंपिंगची सुविधा असणार्‍या काही ठिकाणांना नक्की भेट द्या.
ऋषीकेशला हे धार्मिक स्थान तर आहेच. शिवाय इथे धाडसी खेळांची आवड असणार्‍यांनाही खूप मजा करता येते. इथल्या मोहन छत्ती येथे बंजी जंपिंगची सोय आहे. इथलं बंजी जंपिंग हा अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. निश्‍चित स्थानाहून बंजी जंपिंग करता येणारं हे भारतातलं एकमेव ठिकाण आहे. जमिनीपासून ८३ मीटर उंचीवर बंजी जंपिंगचं स्थान तयार करण्यात आलं आहे. म्हणूनच हा सर्वात थरारक अनुभव ठरू शकतो. लोणावळ्यालाही बंजी जंपिंगची सोय आहे. इथे तुम्ही ४५ मीटरवरून उडी मारता. इथलं बंजी जंपिंग सुरक्षित मानलं जातं. दहा वर्षांच्या पुढील व्यक्ती बंजी जंपिंग करू शकतात. इथे कमी किंमतीत या थरारक क्रिडाप्रकाराचा अनुभव घेता येतो.
बंगळूरूतल्या बंजी जंपिंगसाठी तुमच्याकडे पुरेसा अनुभव हवा किंवा धोका पत्करायची तयारी हवी. इथे बंजी जंपिंगसाठी निश्‍चित असं स्थान नाही. तुम्हाला क्रेनमधून उडी घ्यावी लागते. त्यामुळे धोकाही वाढतो. ८0 फूट उंचीवरून उडी मारायची असते. त्यामुळे मन घट्ट करूनच बंजी जंपिंग करा. गोव्यात अंजुना बीच परिसरात बंजी जंपिंगचा आनंद घेता येतो. इथे फक्त २५ मीटरवरून उंडी मारायची असल्यामुळे छातीत फार धडधडणार नाही.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!