मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लवकरच तिचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या कंगना तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दरम्यान सोशल मीडियावर कंगनाने चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने या सीनच्या चित्रीकरणासाठी २५ कोटी रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे.
नुकताच कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर धाकड चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत तिने, मी असा कोणताही दिग्दर्शक पाहिला नाही जो रिहर्सल्ससाठी इतका वेळ आणि महत्त्व देतो. चित्रपटातील सर्वात मोठा अँक्शन सीन शूट करत आहोत. पण या सीनसाठी केलेली तयारी पाहून मला आश्चर्य वाटले. मला खूप काही शिकायला मिळत आहे. या एका अँक्शन सीनसाठी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे. धाकड हा एक अँक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना एक स्पेशल एजंट अग्निची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटाचे पोस्टर पाहता कंगना एका वेगळ्या अंदाजाच पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिका साकारत आहे. तर तिच्यासोबत दिव्या दत्ता, अर्जुन रामपाल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोहेल मकलाई करत असून रजनीश घई या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
धाकडमधील एका सीनसाठी खर्च केले २५ कोटी रुपये
Contents hide