• Mon. Jun 5th, 2023

दोषी परिचारिकांना नोकरीवरून काढले

ByGaurav Prakashan

Feb 11, 2021

मुंबई : भंडारा येथील रुग्णालयाला आग लागण्यासाठी तेथे कामावर असणार्‍या दोन परिचारिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसत असल्याने त्यांना नोकरीवरून काढून लेखी अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर गुन्हे दाखल करू अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
भंडारा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीला नवजात शिशु अति दक्षता कक्षात आग लागून १0 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला होता तर एका बाळाचा रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर घरी मृत्यू झाला असून बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे. राजेश टोपे म्हणाले, रात्री साधारण १२ मिनिटांच्या काळामध्ये एक लहानसा स्पार्क शिशु दक्षता कक्षात झाला. त्यानंतर तो वाढत गेला आणि आग लागली. त्यावेळेस मुले जिथे ठेवली होती तिथे दोन नर्सेसची ड्युटी होती. ड्युटीच्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्या जागेच्या बाहेर होत्या. दोषी शुभांगी साठवणे व स्मिता आंबीलढुके यांनी नसिर्ंग स्टेशनला प्रत्यक्ष राहणे अपेक्षित होते. आरोग्यमंत्री म्हणाले, दोन्ही परिचरिकांचा, त्यांचा फोनच्या संदर्भातला कॉल व इंटरनेटचा डेटा भंडार्‍याचे पोलिस अधीक्षक वसंत जाधव तपासून बघत आहेत. सीसीटीव्हीचा फुटेजचा प्राथमिक अहवाल फॉरेन्सिक लॅब मुंबई येथून प्राप्त झाल्यानंतर दोन्ही परिचारिकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. गुरुवारी माझ्याकडे अधिकृत रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *