• Tue. Jun 6th, 2023

देशाच्या एकतेसाठी शपथ घ्या

ByGaurav Prakashan

Feb 5, 2021

नवी दिल्ली : देशाच्या एकतेला आपले प्राधान्य राहील अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. चौरी-चौरा शताब्दी महोत्सवानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एका टपाल तिकिटाचे उद््घाटन करण्यात आले. शेतकरी हितासाठी सरकारने पावले उचलली आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोनाच्या काळात देशाच्या समोर जी आव्हाने होती, त्यावर तोडग्यासाठी यंदाचे बजेट नवा वेग देईल. अनेक दशकांपासून आपल्या देशात कोणाच्या नावाने काय घोषणा केली इतकाच बजेटचा अर्थ राहिला होता. बजेटला वोट बँकेच्या हिशोबाची वही बनवून ठेवले होते, अशा शब्दांत मोदींनी बजेटवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले.
शेतकर्‍यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, जर आपला शेतकरी अधिक सशक्त झाला तर कृषी क्षेत्रात होत असलेली प्रगती आणखी वेग घेईल, यासाठी बजेटमध्ये अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. बाजार शेतकर्‍यांच्या फायद्याचा व्हावा यासाठी १000 आणखी बाजारांना ई-नामशी जोडण्यात येणार आहे.
या संदर्भात ट्विटर द्वारे आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, चौरी चौराचे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. सकाळी ११ वाजता दृकर्शाव्य माध्यमाद्वारे चौरी चौरा शताब्दी समारंभाचे उद््घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ४ फेब्रुवारी या दिवशी चौरी चौरा घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील ही ऐतिहासिक घटना आहे. उत्तर प्रदेश सरकारद्वारा राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यात ४ फेब्रुवारी २0२१ पासून ते ४ फेब्रुवारी २0२२ पयर्ंत आयोजित शताब्दी समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *