सूरत: गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील कडोदरा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुक्रवारी एका पत्नीने आपल्या भावासोबत मिळून दारुड्या पतीला अद्दल घडवण्यासाठी टेम्पोला बांधून अर्धा किलोमीटर फरफटत नेले. दरम्यान, टेम्पो थांबवल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही आरोपींना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधिन केले. यातील जखमी पतीला सूरतच्या स्मीमेर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
script async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”>
शीतल यांनी पोलिसांना सांगितले की, पती बालकृष्ण एका मिलमध्ये काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. तो रोज दारू पिऊन शीलत यांना मारहाण करतो. यामुळे पतीला अद्दल घडवण्यासाठी असे केले. शीतलने आपला भाऊ टेम्पो चालक अनिलला घरी बोलवले आणि टेम्पोला बांधून फरफटत नेले.
script async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”>