• Tue. Sep 26th, 2023

तुटलेले हाड सांधताना..

ByGaurav Prakashan

Feb 17, 2021

अपघाताने अथवा कोणत्याही कारणाने एखादं हाड तुटलं तर काही काळात ते आपोआप जुळून येतं. निसर्गानेच तुटलेली हाडं सांधण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणार्‍या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि तथे फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो.
तो हाडाला स्थिर करून तुटलेली टोकं सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतात. त्यामुळे तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. टोकांमध्ये तयार झालेली फिट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी आणि उती तयार होऊ लागतात. आता ऑस्टीओब्लास्ट पेशी कामाला लागतात आणि त्या तथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात.
थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फिट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!