• Sun. Jun 11th, 2023

तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

ByGaurav Prakashan

Feb 8, 2021

आरोपी विरोधात पोस्को, अँट्रॉसिटी, बलात्काराचा गुन्हा दाखल
तिवसा : तिवसा तालुक्यातील एका १२ वर्षीय आदिवासी मुलीवर एका ४५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना तिवसा पोलीस ठाण्या अंतर्गत उघडकीस आलेली आहे. या मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींस तिवसा पोलिसांनी अटक केली आहे. विठ्ठल कामठे(वय ४५)असे नराधम आरोपीचे नाव आहे.आरोपीने पीडित मुलीला एका गावात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून तिचा लैगिंक छळ करण्यात केला आहे. घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात दिलेली आहे.तर मुलगी ही ७ व्या वर्गात शिक्षन घेत आहे असून यात मुलीच्या आईच्या तक्रारी वरून तिवसा पोलिसांनी कलम ३७६,(३),सह कलम ४,६,पोस्को सह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर आरोपिचा शोध घेत तिवसा पोलिसांनी काही तासात आरोपी नराधमास अटक केली असून या घटनेने तिवसा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *